Ladki Bahin Yojana July Hafta – महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ जुलै 2024 मध्ये सुरू झाली होती. आजपर्यंत या योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यवधी महिलांना फायदा झाला आहे. ११ हप्त्यांमध्ये प्रत्येकी ₹1500 प्रमाणे एकूण ₹16,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.
आता महिलां जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकारने अजून अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, पण असे सांगितले जात आहे की ही रक्कम जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळू शकते.
सरकारने काही नियम ठरवले आहेत. फक्त जे महिलांवर हे नियम लागू पडतात, त्यांनाच पुढील रक्कम मिळेल. ज्या महिलांनी नियम पाळले नाहीत, अशा महिलांचे अर्ज आता रद्द करण्यात आले आहेत.
✅ हे आहेत पात्रतेचे नियम:
- महिलांचे वय २१ ते ६५ वर्षांदरम्यान असावे.
- ती महिला महाराष्ट्रात राहणारी असावी.
- तिचे किंवा तिच्या कुटुंबाचे वर्षाकाठी उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
- घरात कोणीही सरकारी नोकरीत नसावे.
- ती महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घेत नसावी.
- घरात चारचाकी वाहन नसावे (ट्रॅक्टर चालेल).
फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई!
अनेक महिलांनी चुकीची माहिती देऊन योजना घेतली होती. सरकारने अशी फसवणूक करणाऱ्या लाखो महिलांचे अर्ज रद्द केले आहेत. महिला आणि बाल विकास विभागाने अलीकडेच २,२८९ सरकारी कर्मचाऱ्यांचे अर्जही रद्द केले, जे बेकायदेशीररित्या या योजनेचा लाभ घेत होते.
सरकारचा स्पष्ट इशारा – फक्त खरच गरजूंनाच मदत!
महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे की सर्व अर्जांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी नेहमी सुरूच राहील.
❗ लाडक्या बहिनींनो…
जर तुम्ही या योजनेचा फायदा घेत असाल, तर वर दिलेले नियम नीट तपासा. नाहीतर पुढची ₹1500 ची रक्कम थांबू शकते. सरकार आता नियम कडक करत आहे.
तुमचा अर्ज अजूनही योजनेत आहे का?
👉 तात्काळ तपासा आणि काही अडचण असल्यास स्थानिक कार्यालयाशी संपर्क करा.