पाऊस का पडतो?
हा प्रश्न तुम्हाला पण कधी ना कधी पडला तर असेलच, तर मग याचे उत्तर तुम्हाला आज भेटणार आहे.
पाऊस हा निसर्गाची अद्भुत देणगी आहे. तो पृथ्वीवरील सजीवांचे अस्तित्व टिकवतो.
सूर्याच्या उष्णतेने तलाव, नद्या, समुद्रातील पाणी वाफ बनून आकाशात जाते.
थंड हवेत वाफेचे बारीक कण एकत्र येतात आणि पांढर्या-मोठ्या ढगांमध्ये बदलतात.
वारा ढगांना इकडे-तिकडे नेतो. ढग मोठे होतात आणि पाण्याचा साठा तयार करतात.
थंड हवेमुळे ढगांतील वाफ पाण्याच्या थेंबांमध्ये बदलते, आणि ढग जड होत जाते.
जड थेंब जमिनीवर कोसळतात, यालाच आपण
"पाऊस"
म्हणतो.
कधी रिमझिम पाऊस, कधी मुसळधार, तर कधी गारांसह पाऊस पडतो
पाऊस जमिनीला ओलावा देतो, नद्या भरतो, आणि वाफ होऊन पुन्हा आकाशात जातो.
पाऊस
शेतीला, झाडांना, प्राण्यांना आणि मानवांना
जीवन
देतो.
सरकारी योजना आणि नोकरी च्या अपडेट्स साठी आपला ग्रुप जॉईन करा.